Disha Vakani: दिशा वकानीनं दिली पुन्हा ‘गुड न्यूज’, लवकरच दयाबेन शो मध्ये परत येणार – प्रोड्युसर

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या अनेक वर्षांपासून चालणाऱ्या कॉमेडी शोच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एकीकडे शैलेश लोढा आणि मुनमुन दत्ताने शो सोडल्याची बातमी समोर येत असतानाच आता दयाबेन शोमध्ये पुनरागमन करू शकतात अशीही एक बातमी समोर आली आहे आणि यावर स्वतः शोच्या निर्मात्यानेच शिक्कामोर्तब केले आहे.

दिशा वकानी दुसऱ्यांदा झाली आई

Disha Vakani दिशा वकानी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील मुख्य अभिनेत्री दिशा वाकानी उर्फ ​​दयाबेन दुसऱ्यांदा आई झाली आहे. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला आहे. तिचे पती मयूर पडिया आणि तिचा भाऊ अभिनेता मयूर वाकाणी यांनी यानी दिशा वकानीला पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे मीडियाला सांगितले. शोमध्ये सुंदरलालची भूमिका साकारणाऱ्या मयूरने मीडियाला सांगितले की, ‘मी पुन्हा मामा बनलो याचा मला आनंद आहे. 2017 मध्ये दिशाला मुलगी झाली आणि आता ती पुन्हा आई झाली आहे आणि मी पुन्हा ‘मामा’ बनलो आहे. मी खूप आनंदी आहे.

Download Movie

हे पण वाचा: Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection Day 5: 100 करोड़ से बस इतनी दूर है, भूल भुलैया 2 इस साल की सबसे बडी ओपनिंग करने वाली हिंदी फिल्म

दयाबेन पुन्हा शो मध्ये वापस येणार

Disha Vakani and

असित मोदी यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘दयाबेन ही भूमिका परत मालिकेत न आणण्याचं आमच्याकडे कोणतही कारण नाही. 2020 आणि 2021 हा अनेकांसाठी कठिण काळ होता. पण आता 2022 मध्ये चांगल्या काळाची सुरूवात झाली आहे. आता लवकरच दया तुमच्या भेटीस येणार आहे. आता प्रेक्षक पुन्हा दया आणि जेठालालची जोडी पाहू शकणार आहेत” यावर बोलताना ते अस ही म्हणाले की मला माहित नाही दिशा परत येणार की नाही पण दयाबेन ची भूमिका परत येणार. ती भूमिका दिशा साकारले किंवा निशा पण दयाबेन पुन्हा शो मध्ये वापस येणारच.

हे पण वाचा: Actress: या अभिनेत्रीचे बोल्ड सीन्स पाहून फुटला घाम, दार बंद करूनच पहा ही वेबसिरीज !

मयूरने सांगितले दिशा वकानी शो मध्ये परतणार

Download Movie

याविषयी विचारले असता मयूर म्हणाला, दिशा निश्चितपणे शोमध्ये परतेल याला खूप दिवस झाले आहेत आणि तारक मेहता का उल्टा चष्मा हा एकमेव शो आहे ज्यामध्ये तिने इतकी वर्षे काम केले आहे. ती सेटवर कधी कामावर परतेल याची आपण सर्वजण वाट पाहत आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो, दिशा शेवटची 2019 मध्ये शोमध्ये दिसली होती, जेव्हा तिने एका एपिसोडसाठी शूटिंग केले होते. मात्र, आता मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्याबद्दल अपडेट देताना तिचा पती मयूर पडिया म्हणाला की, दिशा आमच्या नवजात बाळामध्ये व्यस्त आहे आणि ती लवकरच तुमच्याशी बोलेल.

Leave a Reply

Your email address will not be published.